कृषि उत्पन्न बाजार समिती, औराद शा.

लातूर जिल्ह्यातील अग्रगन्य बाजार समिती


शेतकरीचे समोर लीलाव (सौदा) करून सर्व बाबतीत पारदर्शकता,विश्वासहर्ता असणारे एकमेव बाजार समिती

मनुष्य जन्मापासून भूक भागवण्यासाठी निसर्गावर अवलंबून होता.अश्मयुगात मनुष्याला निसर्गापासून झाडाची फळे, अन्नधान्याचे ज्ञान आत्मसात झाले, उदर भरणे कामी याचा वापर सुरु झाला. एका हंगामातील फळे, फुले, अन्न हंगाम संपले नंतर मिळत नाहीत, त्यामुळे हंगाम चालू असताना त्या धान्याचे साठवण करणे आणि हंगामाच्या सुरुवातीस त्यांचे बीज टाकण्याची प्रक्रिया छोट्या क्षेत्रावर सुरू झाली. त्यातून शेती करण्याचे ज्ञान आत्मसात झाले.

पुढे चालून वस्तू विनिमय पद्धत चालू झाली. बदलत्या काळाप्रमाणे विक्री व्यवस्था नाण्याच्या मोबदल्यात धान्य देणे सुरुवात झाले, गावे,शहरे वसत गेली, वाढत लोकसंख्या व वाढत्या गरजा यातून खरेदी विक्रीच गती मिळत गेली. भारतामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात वेगवेगळे राज्य त्यांचे राजशाही शासक होते, अखंड भारतासाठी शेतीविषयक वेगवेगळी राज्य व वेगवेगळी नियमावली तयार झाली, कालांतराने ब्रिटिशाचे राज्य भारतावर आले जमीनदारी, रयतवारी,महालवारी पद्धत कायदे आणले.कायदा दक्खन राहत कायदा 1879 विविध कृषी धोरणामुळे भारतीय शेतीचे व्यवस्थीकरण झाले.

पुढे भारत देश 1947 मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर शेतीमालाची खरेदी विक्रीबाबत पहिल्यांदा अधिनियम व नियमन करण्यासाठी कायद्याचे रूप देण्याचे ठरले त्याप्रमाणे “महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री( विकास विनिमय) अधिनियम 1963” तयार करण्यात आले. त्यामध्ये नियमावली तयार करण्यात आली 1967 प्रमाणे नियम बनवले गेले, व खऱ्या अर्थाने संपूर्णरित्या नियंत्रण विनिमय शेतमाल खरेदी-विक्रीबाबत तयार झाले. व त्यानुसार शेतमालाचे खरेदी -विक्री व बाजार समितीचे कामकाज चालू झाले.

कृषी उत्पन्न बाजार समिती औराद शा ही बाजार समिती 1962 पासून शेतकरीच्या सेवेत कार्यरत होती, सदरची बाजार समिती निलंगा बाजार समितीची उपबाजार म्हणून कामकाज करत होती शेतीमाल पारंपारिक पिके उडीद ,मुग ,चना बाजरी,करडी,तूर,गहू आदि पिके शेतीमालाच्या खरेदी विक्री वर नियमन करीत असे.

9 ऑगस्ट 1947 रोज निलंगा बाजार समिती मधून औराद बाजार समिती स्वातंत्र्य बाजार समितीच्या दर्जा मिळाला. 1997 पासून सदरची बाजार समिती आजतागायत शेतमालाचे नियमन करीत असून शेतकऱ्याच्या सेवेत कार्यरत आहे. सदरची बाजार समिती कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ असून कर्नाटक राज्याचा शेतमाल पण येथे विक्रीस येतो, आज रोजी या बाजार समितीची उत्तर भारत व दक्षिण भारतात उत्तम ख्याती असून स्वच्छ व सुंदर शेतमाल येथे मिळतो म्हणून ओळख असून औराद शा हे ब्रांन्ड म्हणून प्रसिद्ध आहे. व येथील शेतमालास व्यापारांना जास्तीचा भाव मिळतो. आज रोजी या बाजार समितीस सोयाबीन, तूर, उडीद, मूग, चना, सूर्यफूल, बाजरी, गहू, करडी इत्यादी शेतमाल आवक मोठ्या प्रमाणात होत असून शेतकऱ्याना यांचा योग्य भाव मिळतो व व्यापाऱ्याना मुबलक दर्जेदार शेतमाल मिळतो, सदरची बाजार समिती “अ” वर्गात असून आर्थिक दृष्ट्या बाजार समितीतर्फे केवळ शेतमालाचे नियमन होत नसून त्यासोबत सामाजिक, धार्मिक, उपक्रम प्रशिक्षण, शेतकरी जनजागृती, पिक प्रत्यक्षीके, हवामान पीक केंद्र चालवत आहे.

बाजार समितीतर्फे शेतकऱ्याना पुरामध्ये शेतमालाची बनीम वाहूनगेली किंवा वीज पडून शेतमालाचे व पशु किंवा अवजारे मनुष्य व वित्त हानी झाली असेल तर त्याचे पुनर्वसन केले जाते. शेतकऱ्याना शेतमाल मोबाईलवर व्हाट्सअप ग्रुप करून शेतमालाचे भाव कळवले जाते , शेतकऱ्याचे शेतीमालाचे सौदे शेतकऱ्यासमोर उघड केले जाते, पारदर्शीता असून कुठलीही फूट होऊ दिली जात नाही, कडता, सॅम्पल, मातरे, वजन तुट कसली कपात केली जात नाही. नगद, रोख पट्टी शेतकरीच्या हातात दिली जाते. शेतकरीच्या मोबाईलवर हवामान अंदाज दिला जातो , सोबतच कीडरोग नियंत्रण सल्ला पण दिला जातो.

व्यापार करते वेळेस काही दुर्घटना घडली तर त्या परिवाराचे पुनर्वसन केले जाते, यार्डातील कामगार हमाल मुनीम,बाजार समितीचे कर्मचारी, सर्व अनुज्ञप्तीधारकाचे अपघाती विमा काढणारी महाराष्ट्रातील ही पहिली बाजार समिती आहे. सोबतच एक आर्थिक वर्षात एका शेतकऱ्याचे 25 क्विंटल शेतमाल विक्रीस आणला तर त्याला 10 लाख रुपयांचा अपघाती विमा बाजार समितीतर्फे दिला जातो, अनेक सामाजिक उपक्रमात उपक्रमात बाजार समितीची सिंहाचा वाटा असतो, कृषी प्रदर्शने केली जातात, शेतकरी व कर्माच्या प्रशिक्षणास प्रशिक्षित केले आहे. बाजार समितीतर्फे हरित महाराष्ट्रासाठी प्रतिवर्षी वृक्षरोपण केले जाते, त्यांचे संगोपन संरक्षण केले जाते बाजार समितीतर्फे शेतकरी व्यापारी हमाल मदतनीस यांना स्वच्छ पेयजल मिळावे यासाठी आरो प्लान्ट उभारणी केली आहे. 24 तास पाणी उपलब्ध असून प्राण्यासाठी पण बांधणी करून पाण्याचे पाणीचे हौद बाधून नियोजन केले आहे़.तसेच बाजारामध्ये सर्वात अगोदर जो शेतीमालाचे सीजन चालू होत आहे ते शेतीमाल सर्वात अगोदर जो शेतकरी शेतीमाल घेऊन येईल त्याचा व ज्या अडतीवर माल आणेल त्या अडतेचा, जो शेतीमाल खरेदी करेल त्यांचा सत्कार करण्यात येत असतो.

बाजार समितीमधील शेतमालातील माती, काडी कचरा, घाण कचरा यांच नियोजन केले असून गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प चालू केला आहे. बाजार समितीमध्ये प्रशस्त रस्ते रस्त्यांनी दुतर्फा पाणी व्यवस्थापन नालीकाम करून नाल्या काढल्या आहेत. दिवाबत्ती उत्तम सोय करून ठेवली आहे, शेतकऱ्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधकाम करून उत्तम व्यवस्था केलेली आहे. शेतकऱ्यासाठी इलेक्ट्रॉनिक 50 टन वजनी काटा शेतीमाल वजन मोफत केलेला आहे. सुरक्षितता व वर्दळीच्या ठिकाणे आवक पाहून सर्वत्र ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत, आधुनिक जगाच्या समस्या व गरजांचा विचार करून बाजार समितीतर्फे नियोजन केले आहे आदर्श बाजार समिती म्हणून औराद बाजार समितीचा आलेख दिवसेंदिवस चढत आहे.